राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त आज रविवार १५ ऑक्टोबर ते मंगळवार ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त आज रविवार १५ ऑक्टोबर ते मंगळवार २४ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सोमवार १६ ऑक्टोबर ते बुधवार १८ ऑक्टोबर या कालावधीत रात्री ९ वाजता रामायणचार्य देवी भागवतकार ह.भ.प अमृतानंद महाराज कांकरिया(लातुरकर) यांच्या सुश्राव्य वाणीतून वैष्णवी देवी महात्म्य कथा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजप श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष नितीन दिनकर, धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष राजुभाऊ शेटे यांचे सौजन्य लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत