राहुरी फॅक्टरी/वेबटिम:- राहुरी फॅक्टरी येथील पावन गणपती मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने रविवार दिनांक १५ ऑक्टोबर ते मंगळवार द...
राहुरी फॅक्टरी/वेबटिम:-
राहुरी फॅक्टरी येथील पावन गणपती मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने रविवार दिनांक १५ ऑक्टोबर ते मंगळवार दि.२४ ऑक्टोबर या कालावधीत विविध सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी ४ वा. देवीची स्थापना व घटस्थापना गुरुकुल वसाहत येथील रहिवासी श्री.व सौ. बाळासाहेब तुपे यांच्या हस्ते संपन्न झाली.
सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ वाजता भव्य संगीत खुर्चीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.
तर मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ९ वाजता जागर देवीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
तर बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ९ वाजता भव्य डान्स स्पर्धा आयोजन करण्यात आला आहे.
तर गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी हभप नामदेव महाराज शास्त्री मु.पो.जातप यांचे जाहीर हरिकीर्तन सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत संपन्न होणार आहे.
तदनंतर शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ वाजता मोटिवेशनल स्पीकर अनिल रामभाऊ येवले यांच्या सादरकर्ते होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन पावन गणपती मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ वाजता स्वरजित संगीत मैफिल प्रा. अजित येवले यांच्या बहारदार गीतांचा ऑर्केस्ट्रा संपन्न होणार आहे.
रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी वेदाचार्य प्रकाश नवले गुरु यांच्या मंत्रोच्चारात होम हवन संपन्न होणार आहे.
तर सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ वाजता भव्य दांडिया संपन्न होणार आहे.
मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक पावन गणपती मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवात होणार आहे.
तरी या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन पावन गणपती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत