राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील महावीर जनरल स्टोअर जवळील श्री.तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील महावीर जनरल स्टोअर जवळील श्री.तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळाच्या वैष्णवांचा मेळा या देखाव्याचे उद्घाटन आज सोमवार १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या हस्ते तर शिवसेना अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिनकर गर्जे, माजी नगरसेविका सुजाता कदम, एकनाथ बनकर, मनसे तालुकाध्यक्ष अनिल डोळस, शिवसेना तालुकाप्रमुख विजय गव्हाणे, उद्योजक पियुषशेठ चोरडिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
भव्य दिव्य विठ्ठल मूर्ती व वारकरी देखाव्याचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक शुभम जाधव, अध्यक्ष कृष्णा खर्डे व श्री तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत