राहुरी(वेबटीम) भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी धामोरी येथील युवा कार्यकर्ते अमर सातुरे तर उपाध्यक्षपदी...
राहुरी(वेबटीम)
भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी धामोरी येथील युवा कार्यकर्ते अमर सातुरे तर उपाध्यक्षपदी डिग्रस येथील युवराज पारडे यांची निवड करण्यात आली. राहुरी येथील अतिथी हॉटेलमध्ये जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी संदिप पाळंदे यांची जिल्हा मीडिया प्रभारी, प्रकाश ओहोळ तालुका सचिव, फिरोज शेख कोषाध्यक्ष, अक्षय ओहोळ, सुनिल गिर्हे संघटक पदी नेमणुका करण्यात आल्या.
मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष संसारे यांनी सांगितले की, आगामी काळात भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या माध्यमातून खाजगीकरण, कंत्राटीकरण, ओबीसींची जातीनिहाय जनगणना आदी महत्वाच्या प्रश्नांवर बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी गाव तेथे शाखा स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापुरुषांचे आंदोलन पुढे नेऊन त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी तन-मन-धनाने काम केले पाहिजे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय संसारे, बामसेफचे मनोज ओहोळ, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, संतोष डागवाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत