श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबादचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचे चेअरमन दत्तात्रय खेमनर यांना ...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबादचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचे चेअरमन दत्तात्रय खेमनर यांना डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट कडून राज्यस्तरीय हवामान तज्ञ पुरस्कार 2023 जाहीर झाल्याबद्दल श्रीरामपूर येथील शासकीय विश्रांतीगृह येथे श्रीरामपूर दहीहंडी उत्सव समिती आयोजित सर्वपक्षीय नागरी सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून स्वामी अरुण नाथगिरी महाराज हे होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेमनर यांचा भव्य असा सत्कार केला. याप्रसंगी स्वामी अरुण नाथगिरी महाराज यांनी दत्तात्रय खेमनर हे लवकरच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हवामान तज्ञ म्हणून नावारूपाला येथील असा आशीर्वाद दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, कामगार नेते नागेश सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज भिसे, अशोक बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश ताके, भाऊ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक प्रसाद म्हसे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष मोहन आडांगळे, सामाजिक कार्यकर्ते सलमान शेख, शिव दशनाम, गोसावी समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्याम गोसावी, पांडुरंग आठरे, सुमित कापसे, अतुल वडने, बंडू शिंदे, संजय कुदनर, भागचंद नवगिरे, पत्रकार प्रदीप आहेर, संतोष बोरुडे, पांडुरंग आठरे, सुमित कापसे, महेश कुदनर, भारत कोळेकर, लक्ष्मण बाहुले, लक्ष्मण काळे, प्रमोद भालेराव, दत्तात्रय हळनोर, चेतन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिजीत लिफ्टे केले तर आभार भैया भिसे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत