मृत्यूनंतर,.. पुन्हा शिक्षा आणि दंड.. तमाम शिवसैनिकांना सप्रेम जय महाराष्ट्र...निष्ठा आणि विष्ठा यातला फरक कळणाऱ्या शिवसैनिकांसा...
मृत्यूनंतर,.. पुन्हा शिक्षा आणि दंड..
तमाम शिवसैनिकांना सप्रेम जय महाराष्ट्र...निष्ठा आणि विष्ठा यातला फरक कळणाऱ्या शिवसैनिकांसाठी मनोगत व्यक्त करताना आयुष्यातील घातलेल्या ३२ वर्षांचा कालावधी या सदरील मनोगत लेखात लिहिणं शक्य नाही,कारण मनापासून श्रध्दा आणि निष्ठा ठेवून रक्ताच्या नात्यांचा, जीवलग मित्रांचा,प्रपंचाचा विचार न करता शिवसेना विरोधकांना नामोहरम करण्यासाठी शिवसेना स्टाईलने काम करत राहीलो,.परिणामी तडीपाऱ्या भोगाव्या लागल्या,.विरोधकांच्या षडयंत्रात संसाराची राखरांगोळी झाली, विरोधकांच्या अमिषाला कधी बळी गेलो नाही,.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना त्यांच्या दिर्घायुष्यासाठी मुंबईत दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी कोपरगाव शहरातून ११ ब्राह्मण व ३० शिवसैनिक त्यावेळीचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब डमाळे,शहरप्रमुख काका शेखो यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत नेऊन महामृत्युंजय यज्ञ महापौरांच्या बंगल्यावर केला,सकाळी ७:०० वाजेपासून ते रात्री १०:०० वाजेपर्यंत मंत्रोच्चाराच्या जयघोषात अनेक शिवसेना नेत्यांच्या आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत महामृत्युंजय यज्ञ पार पडला,न्युज लाइव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने सोहळा बघितला,. कोपरगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील पहिले प्रवेशद्वार शिवसैनिकांच्या सहकार्याने बांधले आणि आज दिमाखात प्रवेशद्वार उभे आहे,१९९२ साली उपशाखाप्रमुख झालो,१९९८ साली शाखाप्रमुख झालो,. नंतर उपशहरप्रमुख, शहरप्रमुख, नगरसेवक, एसटी कामगार सेना अध्यक्ष अशी अनेक पदे कर्तृत्त्वावर आणि निष्ठेच्या ताकदीवर जनसेवेसाठी भोगली,.आणि आजच्या घडामोडीत निष्ठेचे मन दुखावले गेले,.ज्या दिवशी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा पक्षाला , पक्षप्रमुखांना फसवून पक्षप्रवेश करण्यात आला त्याचदिवशी आजपर्यंतच्या अनेक निष्ठावंत शिवसैनिकांच्या निष्ठेचा मृत्यू झाला,.आणि गद्दारी केलेल्या याच वाकचौरेंना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देऊन निष्ठेला मृत्युनंतरही शिक्षा देवून एकप्रकारे दंड केला गेला,.
आदेशानुसार काम करणारे अनंत शिवसैनिक अजून जीवंत आहे,पण एका गद्दाराला पुन्हा प्रवेश मिळावा, उमेदवारी मिळावी यासाठी धडपड करणाऱ्या मुठभर लोकांची खरंच किव येते, कारण अंतर्गत वादामुळे,पद गेल्यामुळे पक्षप्रमुख उद्धवसाहेब आणि शिवसेना समान आईला आपण फसवतो आहे,याचे भान सुध्दा काही लोक ठेवत नाही हेच मोठं दुःख आहे,.एकदा तरी या लोकांनी आपल्या अंतर्मनात झाकून बघावं आपण काय चुक करत आहे,.? वाकचौरे यांच्यावर बसलेला विखेंचा शिक्का हा मजबूत शाईचा असून तो धुवून निघने आता शक्यच नाही,कारण जगजाहीर आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लहान मुलगाही सांगेल की वाकचौरे हा विखेंचा माणूस आहे, कारण वास्तविक सत्य परिस्थिती हे सगळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतदार जाणून आहे,. कृपया बेंबीच्या देठापासून विनंती याची वरिष्ठांनी दखल घ्यावी,कारण अजूनही वेळ गेलेली नाही,.आपण शिवसेना एक लोकसभेचे निवडून येणारे शिट गमावून बसू,.कारण गद्दारी या शब्दाशी आता शिवसैनिक तर चिडलेले आहेच पण सर्वसामान्य जनताही तितकीच चिडली आहे,या संधीचा पक्षाला जनहितासाठी फायदा व्हावा हिच अपेक्षा
वाकचौरेंनी तेंव्हा शिवसेना सोडतेवेळी शिवसेनेच्या व्देषापोटी संगमनेर मधील १०६,तर कोपरगाव शहरातील एकूण १२ निष्ठावंत शिवसैनिकांवर केसेस टाकल्या,. तब्बल दहा वर्षांपासून शिवसैनिक कोर्टात खेटा मारत आहे,.तरीपण गद्दार वाकचौरेंचा पुन्हा प्रवेश होतो, उमेदवारी मिळते,हा तर तमाम शिवसैनिकांचा अपमान केला जात आहे,.शिवसैनिकांचे दुखणे कधी पक्षप्रमुखापर्यंत पोहचतील देव जाणे,.वाकचौरे आजही फोनवर बोलताना .. " मला शिवसेनेशी काहीही देणेघेणे नाही,मला फक्त खासदार व्हायचे आहे,." मंग आता बोला शिवसैनिक वाचक भावांनो,या विखेंच्या सुपारीबाज वाकचौरेंना फक्त खासदार व्हायचे आहे, शिवसेना संघटना वाढवयाची नाही तर संपवायची आहे,.बस झाले आम्हा निष्ठावंत शिवसैनिकांना आता पक्ष वाढविणारे फाटके का होईना पण निष्ठावंत उमेदवार निवडून आणत खासदार, आमदार करायचे आहे,गद्दार,भामटे पछाडलेले नको आता
मी शिवसैनिक भरत मोरे शपथ घेतो की,.मी असेच लिहित राहणार आणि या गद्दार भाऊसाहेब वाकचौरेंना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली तर मी या वाकचौरेंचे काम करणार नाही,घरी बसणे पसंत करीन, भलेही पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी माझी हकालपट्टी केली तरी हरकत नाही,मी माझ्या निष्ठेची पावती मिळाली म्हणून समाधान मानेल,पण या गद्दाराच्या सोबत जाऊन मी मायबाप जनतेला फसवणार नाही,.
शिवसैनिक.
भ.मो
दुरध्वनी क्रमांक. ९५५२२२५५२८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत