राहुरी(वेबटीम) मध्य प्रदेश ग्वालियर येथील प्रसिद्ध उद्योजक समाज रत्न भूषण प्रवीण दादा पांडुरंगराव जगताप व विजेंद्र पांडुरंगराव जगताप साहेब य...
राहुरी(वेबटीम)
मध्य प्रदेश ग्वालियर येथील प्रसिद्ध उद्योजक समाज रत्न भूषण प्रवीण दादा पांडुरंगराव जगताप व विजेंद्र पांडुरंगराव जगताप साहेब यांनी परमुलखात राहूनही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती जपत छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून व आई श्रीमती कुसुमताई जगताप यांनी दिलेले संस्काररुपी सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई जगताप (सेवानिवृत्त शिक्षिका तथा आदर्श माता) ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथील यांच्या ७७ वा. अभिष्टचिंतन सोहळा व पितृपक्ष पंधरवाडा निमित्त रविवार, दिनांक ०१ ऑक्टो. २३ रोजी सांय. ०६:०० वाजता महाराष्ट्र राज्याच्या मुलखा पलिकडे पर-मुलखातही राहुरी तालुक्याचे सुपुत्र शिवव्याख्याते हसन सय्यद यांचे मध्यप्रदेशच्या ऐतिहासिक भूमी ग्वाल्हेर येथे व्याख्यान संपन्न झाले, जिजाऊंचे शिवरायांवरील संस्कार आणि स्वराज्याचे उत्थान याविषयावर भव्य जाहीर व्याख्यान ग्वालियर येथील गॅलेक्सी गार्डन, झंवर बिल्डिंग समोर, पंजाब नॅशनल बँक जवळ, स्वामी विवेकानंद चौक, महात्मा गांधी रोड, ठाटीपूर ग्वालियर- (मध्यप्रदेश) या ठिकाणी झाले
दरम्यान शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी अनोख्या शैलीमध्ये शिवरायांचे चरित्र श्रोत्यांसमोर उभे करून मध्य प्रदेश मधील शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास ग्वालेर येथे सादर करताना जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे बाळकडू दिले त्यातून स्वराज्याचे उत्थान झाले त्यामध्ये जिजाऊंनी शिवरायांना दिलेले धडे समता, बंधुता आणि न्याय सोबतच तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी तसेच अचूक निर्णय घेण्याची क्षमता व माणसांना ओळखण्याची पारख अशा विविध गुणांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊ मासाहेबांनी केले तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे भेटीचे वर्णन करताना श्रोते मंत्रमुग्ध होवून व्याख्यानाचा आनंद लूटत होते. सोबतच श्रीकृष्ण व राधा यांचे भजन व गौळण नृत्य व वेशभूषेत सादरीकरण झाले ज्यातून भारतीय संस्कृतीचे विविध संस्काराचे दर्शन घडत होते.
तर शिवव्याख्याते हसन सय्यद यांनी भारदस्त शब्दामध्ये सादर केलेल्या व्याख्यानास भविष्यात पुन्हा एकदा येण्यास श्रोत्यांनी आमंत्रित केले.
दरम्यान मध्यप्रदेश मध्ये ग्वाल्हेर येथे शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी मध्यप्रदेश ग्वालियरच्या भारतीय रेल्वे स्थानकावर प्रस्थान करताच ग्वालियर करांनी शिवव्याख्याते हसन सय्यद यांचे अनोख्या व पारंपारिक पद्धतीने स्वागत सन्मान केले. मध्यप्रदेशच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या नामघोषाचा निनाद गर्जत होता, संपूर्ण ग्वालियर नगरी ही शिवमय झालेली होती.
पितृपक्ष पंधरवाडा व छत्रपती शिवचरित्र व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन जगताप कुटुंबियांतील व आदर्श उद्योजक समाजरत्न भूषण प्रवीण दादा पांडुरंगराव जगताप यांनी केले तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सिंधिया देवस्थान ट्रस्टचे संस्थापक कार्यपालक श्री. अशोककुमार मोहिते, बँक मॅनेजर श्री. रवींद्र जगताप, सौ. आभाताई जगताप, विजेंद्र जगताप, सौ. अमृताताई जगताप, श्री. अनिल देशमुख, श्री. राजेंद्र पाटणकर, श्री. अजय शितोळे, श्री. अनिल पाटील आदी पाहुणे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित मांजरेकर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत