देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बेलापूर रोडवर असलेल्या गडाखवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय ठार तर दु...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बेलापूर रोडवर असलेल्या गडाखवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय ठार तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली आहे.बिबटयाच्या सततच्या दर्शन व जनांवरांवर होणारे हल्ले यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.
देवळाली प्रवरा परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून ठिकठिकाणी जनावरांवर हल्ले होत आहे. बेलापूर रोड येथील गडाख वस्तीवरील शेतकरी गोरक्षनाथ मंजबापू गडाख यांच्या गोठ्यातील गायीवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले तर शिवाजी मंजबापू गडाख यांच्या गायीवर हल्ला केल्याने ती गँभीर जखमी केले आहे.
या घटनेबाबत वनविभागास कळविले असून तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी व परिसरातील पिंजरे लावावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत