राहुरी फॅक्टरी/वेबटिम:- राहुरी फॅक्टरीतील स्वरांश ग्राफिक्स व आवाज जनते वेबपोर्टलच्या माध्यमातून लहान मोठ्या व्यक्तीला प्रकाशझोतात आणून त्...
राहुरी फॅक्टरी/वेबटिम:-
राहुरी फॅक्टरीतील स्वरांश ग्राफिक्स व आवाज जनते वेबपोर्टलच्या माध्यमातून लहान मोठ्या व्यक्तीला प्रकाशझोतात आणून त्यांच्या कार्याचा गौरव करत प्रोत्साहन दिले जाते हे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन आ.निलेश लंके यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत बस स्टॅन्ड नजीक असलेल्या अनिल कॉम्प्लेक्स येथील स्वरांश ग्राफिक्स व आवाज जनतेचा वेबपोर्टल दालनास गुरुवारी रात्री आ.लंके यांनी भेट दिली. प्रसंगी त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आ.लंके म्हणाले की, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी व इतर माहिती काही क्षणातच जनतेपर्यंत पोहोचते. आवाज जनतेचा वेबपोर्टल व स्वरांश ग्राफिक्स माध्यमातून अनेकांना न्याय देण्याचे कार्य सुरू असल्याचे आ.लंके यांनी म्हंटले आहे.
यावेळी सुदाम पवार, अँड.राहुल झावरे,श्रीलेश मेसे, संजय लाकूडझोडे, सुनील कोकणे, प्रकाश निरगुडे आदी उपस्थित होते.
प्रसंगी पत्रकार श्रीकांत जाधव, पत्रकार ऋषि राऊत, गणेश डावखर, डॉ.योगेश पगारे, सागर भालेराव, प्रणय भोसले, मयुर घावटे, तुषार राऊत, सुनील गीते आदींनी आ.लंके यांचा सन्मान केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत