ताहाराबाद (वार्ताहर) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिला जाणारा ‘मराठा भूषण पुरस्कार' कु. वैष्णवी नरोडे यांना शिर्डी येथे प्रदान...
ताहाराबाद (वार्ताहर)
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिला जाणारा ‘मराठा भूषण पुरस्कार' कु. वैष्णवी नरोडे यांना शिर्डी येथे प्रदान करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘मराठा भूषण पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये वारकरी सांप्रदायातील उल्लेखनीय काम करणाऱ्या राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील कु. वैष्णवी नरोडे यांना प्रशस्तीपत्र-सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शिर्डी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना,‘मराठा भूषण पुरस्कार'देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये चिंचविहिरे येथील इयत्ता ९वी. मध्ये शिक्षण घेत असलेल्या वैष्णवीला सन्मानित करण्यात आले. वयाच्या ५ व्या वर्षांपासून वैष्णवी गायन करत आहे. गायन करता -करता तिने कीर्तन करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर तसेच मध्यप्रदेश येथेही वैष्णवीचे कीर्तन झाले आहे. अल्पावधीत वैष्णवीने वारकरी सांप्रदायात नावलौकिक केले आहे. श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे उपाध्यक्ष बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्याकडे तिने ज्ञानामृताचे धडे गिरवले आहे. वैष्णवीचे वडील भारत नरोडे व आई प्रभावती नरोडे यांच्या मार्गदर्शनातून वैष्णवी संस्काराच्या शिखरावर पोहचली आहे. सर्वत्र तिचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत