राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- उसने पैसे परत न दिल्याच्या रागातून राहुरी फॅक्टरी येथील एका तरुणास मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोली...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
उसने पैसे परत न दिल्याच्या रागातून राहुरी फॅक्टरी येथील एका तरुणास मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राहुरी पोलिसांत अमिकेत संतोष महाडिक वय वर्ष 19 रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी स.९.३० वाजेच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटल या ठिकाणी आरोपी याने मला बोलावून तू माझे उसने घेतलेले पैसे परत दिले का नाही असे विचारत मला जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान अमिकेत संतोष महाडिक यांच्या फिर्यादीवरून उंबरे येथील मयूर बाळासाहेब ढोकणे याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत