राहुरी फॅक्टरी(वेबटीम) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा निर्माण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे राहुरी फॅक्टरीत मराठा स...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा निर्माण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे राहुरी फॅक्टरीत मराठा समाज बांधवांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
राहुरी शहरात विठ्ठला लॉन्स येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा संपल्यानंतर राहाता येथे सभेसाठी जात असताना राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठा समाज बांधव उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत