राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील जि.प.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी मारुती मच्छिंद्र नालकर यांची तर उपाध्यक्ष...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील जि.प.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी मारुती मच्छिंद्र नालकर यांची तर उपाध्यक्ष पदी संदीप पुंजा साळवे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी निवड करण्यासाठी प्रमुख ग्रामस्थ व पालक यांची बैठक झाली यावेळी सदर निवड करण्यात आली. यामध्ये सदस्य म्हणून चांगदेव नालकर, गणेश मुरकुटे, प्रदीप नरोडे, सुरेखा पठारे, कांचन झांबरे, पूजा शिंदे, प्रियंका दिवे, शारदा साळवे, मारुती चोथे आदींची निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक मच्छिंद्र गोफणे, शिक्षक नानासाहेब सोमवते, प्रशांत जवंजाळ,सिमा मुखेदल आदींसह सरपंच राजेंद्र धांबोरे, उपसरपंच भगीरथ नरोडे, दगडुभाऊ गिते, सदस्य जयराम गिते, बाबासाहेब पठारे, संजय नरोडे व पालक उपस्थित होते. नूतन अध्यक्ष मारुती नालकर व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत