राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील बेकायदेशीर वखार चालकावर कारवाई करावी विकास मोकळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील बेकायदेशीर वखार चालकावर कारवाई करावी विकास मोकळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे वनविभागाच्या आधिकारी,कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या बेकायदेशीर वखार...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे वनविभागाच्या आधिकारी,कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या बेकायदेशीर वखारी वर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत राहुरी फॅक्टरी येथील विकास संजय मोकळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, राहुरी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, गोरगरिबांचे कामे करीत असताना सातत्याने होत असलेला भ्रष्टाचार व आशीर्वादाने बेकायदेशीर वखार चालविल्या जातात. त्याच प्रमाणे राहुरी तालुक्यातील मौजे. चिंचविहीरे हद्दीत बेकायदेशीर वखार चालू आहे. सदर वखार चालक हा धकधाकड असून राहुरी तालुक्यातील वृक्षाची बेकायदेशीर तोड करून परस्पर विक्री करत आहे. सदर या बाबी लक्षात येताच स्थानिक कर्मचारी अधिकारी यांना वारंवार सांगुनही ते याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आशिर्वादाने वखार चालक हा कायद्याचा भंग करून धाक जमवित आहे. सदर वखारीवर यापूर्वी बेकायदेशूर वखार चालविल्या संदर्भात कारवाई झालेली असून राहुरी तालुक्यातील वनकर्मचारी, अधिकारी यांच्या आर्थिक हितसंबंधने सदर वखार पुनः सुरु करून बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून जंगले संपवित आहे. यामुळे पर्यावणाचा -हास होण्याची आहे.

तरी मे. साहेब सदर निवेदनाचा तत्काळ विचार होऊन कार्यवाही करावी. सदर वखार चालक व संबंधित कर्मचारी, अधिकारी यांची कार्यवाही झाल्यास मी व माझे सामाजिक कर्ते आम्ही आपले अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. यावेळी होणाऱ्या परिणामास आपणास जबाबदार धरले जाईल असे या निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत