राहुरी(प्रतिनिधी) राहुरी येथील प्रितेश दिलीप तनपुरे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने वृक्ष संवर्धन कार्यात चांगली कामगिरी केल्याबद्...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी येथील प्रितेश दिलीप तनपुरे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने वृक्ष संवर्धन कार्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.सदर पुरस्कार हा शिर्डी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मेळाव्यात विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
प्रितेश तनपुरे यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत त्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढरे, उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, गुलाब गायकवाड,अतिष गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रकाश निर्मळ, शिवाजी डौले, सरचिटणीस रमेश बोरुडे, राहुरी तालुका अध्यक्ष दिनकर पवार,अमोल निकम, विलास वराळे,लालूशेठ दळवी अदि यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत