देवळाली प्रवराच्या प्रज्ञा व प्रगती गडाख यांची राज्य शूटिंग बॉल संघात निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या प्रज्ञा व प्रगती गडाख यांची राज्य शूटिंग बॉल संघात निवड

  देवळाली प्रवरा(वेबटीम):-  42 वी राष्ट्रीय नॅशनल शूटिंग बॉल  स्पर्धा ( मुली / मुलं )सन 2023 दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी सवाई मानसिग स्ट...

 देवळाली प्रवरा(वेबटीम):-



 42 वी राष्ट्रीय नॅशनल शूटिंग बॉल  स्पर्धा ( मुली / मुलं )सन 2023 दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी सवाई मानसिग स्टेडिम जयपूर राजस्थान या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयच्या कु. प्रज्ञा शरद गडाख इयत्ता 12वी विज्ञान व कु.प्रगती रामेश्वर गडाख इयत्ता 12 वी विज्ञान या 2 विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे.तसेच विद्यालयाचे प्राध्यापक श्री भांड गणेश सोपान यांची महाराष्ट्र राज्य संघाच्या टीम मॅनेजर पदी नियुक्ती झाली आहे.



सदर राष्ट्रीय स्पर्धा डी डी स्पोर्ट्स या राष्ट्रीय चॅनलवर लाईव्ह प्रसारित होणार आहे. या स्पर्धेसाठी 4 तारखेला महाराष्ट्राचा मुली व मुलांचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी राजस्थान कडे प्रस्थान करणार आहेत.



या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा श्री जी डी खानदेशे साहेब, मा आ श्री चंद्रशेखर पा कदम ,संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री रामचंद्रजी दरे साहेब ,विश्वास्थ मा श्री जयतजी वाघ साहेब,विश्वास्थ मा श्री मुकेशजी मुळे साहेब,विश्वस्त मा श्री विश्वासरावजी आठरे साहेब विद्यालयाचे प्राचार्य मा श्री कडूस पी डी व सेवक यांनी विशेष अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

 विद्यार्थिनींना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री कुळधरन आर बी,प्रा भांड जी एस व मा श्री पुजारी सर यांचे मार्गदर्शन लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत