राहुरी(वेबटीम) 42 वी राष्ट्रीय नॅशनल शूटिंग बॉल स्पर्धा ( मुली / मुलं )सन 2023 दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी सवाई मानसिग स्टेडियम जयपूर...
राहुरी(वेबटीम)
42 वी राष्ट्रीय नॅशनल शूटिंग बॉल स्पर्धा ( मुली / मुलं )सन 2023 दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी सवाई मानसिग स्टेडियम जयपूर राजस्थान या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी कु. प्रज्ञा संदीप गडाख ,कु.प्रगती रामेश्वर गडाख कु कावेरी बाळासाहेब संसारे व प्रथमेश धनंजय थोरात महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे.तसेच प्राध्यापक श्री भांड गणेश सोपान यांची महाराष्ट्र राज्य संघाच्या टीम मॅनेजर पदी नियुक्ती झाली आहे. श्री राजेंद्र पुजारी सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सदर राष्ट्रीय स्पर्धा डी डी स्पोर्ट्स या राष्ट्रीय चॅनलवर लाईव्ह प्रसारित होणार आहे. या स्पर्धेसाठी 4 तारखेला महाराष्ट्राचा मुली व मुलांचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी राजस्थान कडे प्रस्थान करणार आहेत. त्याबद्दल आज आ.तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात डॉ. उषाताई तनपुरे यांनी खेळाडूंचा सत्कार केला .
१९८५-८६ साली कारखान्याच्या माध्यमातून राहुरी फॅक्टरी येथील शिवनेरी क्लब येथे मा.खा. प्रसाद तनपुरे यांच्या माध्यमातून हॉलीबॉल सरावाची शिवनेरी क्लब येथे सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमामुळे अनेक खेळाडू महाराष्ट्रातील विविध स्पर्धेत चमकले आहेत.
यावेळी देवळाली नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे ,राहुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश भुजाडी, शहाजी जाधव संगीताताई जाधव, राजेंद्र पुजारी,संजय शेरकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत