राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील आदिनाथ वसाहत येथील जिव्हाळा ग्रुप तर्फे मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यां...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील आदिनाथ वसाहत येथील जिव्हाळा ग्रुप तर्फे मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब कोहोकडे यांनी भूषविले तसेच या कार्यक्रमासाठी आय एस ओ लीड ऑडिटर अनिल येवले,श्रीरामपूर पोस्टल सोसायटीचे चेअरमन राधाकिसन पवार, इंजिनीयर विजय अहिरे, सामाजिक कार्यकर्ते तैनुर भाई पठाण,नाभिक संघटनेचे अभिजीत आहेर,अतुल कराड, संजय राजगुरू,माजी नगरसेवक प्रदीप गरड, सचिन सरोदे, व्यापारी संघटनेचे सुनील विश्वासराव,प्रशांत विश्वासराव, सारंग खडककर, डॉ.अनिल भाग्यवान,डॉ.हर्षद चोरडिया, गजानन घुगरकर,रवी डोके, सचिन लोखंडे, सुधाकर लोंढे, निलेश गोफणे, तनवीर शेख, शौकत भाई पठाण, नगरे सर, सोमनाथ आहेर,जालिंदर घाडगे, राजेंद्र बोरुडे,बाळासाहेब गिरी, भास्कर कोळसे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिव्हाळा ग्रुपचे मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत आहेर यांनी केले. व आभार राधाकिसन पवार यांनी मानले.
प्रसंगी नगरपालिकेचे सफाई दुत महिला व पुरुष यांना जिव्हाळा ग्रुप तर्फे मिठाई व गुलाब पुष्प देऊन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात नगरपालिकेचा सफाई कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कर्मचाऱ्यांच्या वतीने संतोष हारदे यांनी जिव्हाळा ग्रुपचे आभार मानले.
जिव्हाळा ग्रुप गेली दोन ते तीन वर्षापासून सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतो व भविष्यामध्ये जिव्हाळा ग्रुप नक्कीच मोठ्या उंचीवर पोहोचेल असे आय एस ओ लीडर व मोटीव्हेशनल स्पिकर अनिल येवले यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण शहेबाज भाई पठाण यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत