राहुरी(वेबटीम) जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठी चार्ज करणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र राज्यातील महानगर...
राहुरी(वेबटीम)
जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठी चार्ज करणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद क्षेत्रातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा कार्पोरेटकडे दत्तक देण्याच्या विरोधात
नऊ खाजगी एजन्सी मार्फत कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यासंबंधी शासनादेश जारी केलेल्या निर्णयाच्या विरोधात,ओबीसीसह भटके विमुक्तांची जातीनिहाय जनगणना करावी,महामानवांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडेला अटक करावी या मागणीसाठी दि.२ ऑक्टोबर रोजी राहुरीत भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
राहुरी येथील बस स्थानकापासून पासून तहसील कार्यालयापर्यंत भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधी रॅली काढण्यात आली. संविधानाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, ईव्हीएम हटाव देश बचाओ, वोट हमारा राज तुम्हारा नही चलेगा यांसह महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिले.
याप्रसंगी बामसेफचे रमेश गायकवाड, सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे अध्यक्ष कांतीलाल जगधने, अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे,भारत मुक्ती मोर्चाचे जगदीश भालेराव,भारत जगधने, विजय भोसले,अक्षय भालेराव, विकास बोरुडे,विजय पवार,रोहित पाटोळे, मोहम्मद शेख, मच्छिंद्र पवार, राजेश पवार, संतोष डागवाले, वंचित बहुजन आघाडीचे निलेश जगधने, पिंटू नाना साळवे, शेतकरी नेते बाळासाहेब जाधव,भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर सातुरे, फिरोज शेख, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे महेश साळवे, युवराज पारडे, रवी पवार, विजय आढांगळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत