श्रीरामपूर(वेबटीम) जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र राज्यातील महा...
श्रीरामपूर(वेबटीम)
जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद क्षेत्रातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा कार्पोरेटकडे दत्तक देण्याच्या निर्णया विरोधात, नऊ खाजगी एजन्सी मार्फत कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यासंबंधी शासनादेश जारी केलेल्या निर्णयाच्या विरोधात, ओबीसीसह भटके विमुक्तांची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी, महामानवांबद्दल अपमान कारक वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडेला अटक करावी या मागण्यांसाठी सोमवारी (दि. ०२) बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांसह विविध समविचारी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या अंतर्गत श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर वरील संघटनांच्या माध्यमातून निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक एस. के. चौदंते, पी. एस. निकम, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गायकवाड, अशोकराव जाधव, काँग्रेस सेवा दलाचे अजगर सय्यद,अशोकराव दिवे, सी. एस. बनकर, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष विशाल गायकवाड, सुधाकर बागुल, गंगाधर शेलार, दिलीप त्रिभुवन, डॉ. अशोक शेळके, एम. एम. पठाण, प्रभाकर ब्राह्मणे, तुषार पारधे, रावसाहेब आल्हाट, लेविन भोसले, अशोकराव जगधने, विठ्ठल गालफडे, फकीरा वाघमारे, राजू लोंढे एम. एस. गायकवाड इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत