राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- बजाज फायनान्सच्यावतीने आयोजित उन्हाळा महोत्सव २०२३ मध्ये संपूर्ण रिजन मध्ये राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
बजाज फायनान्सच्यावतीने आयोजित उन्हाळा महोत्सव २०२३ मध्ये संपूर्ण रिजन मध्ये राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सने बजाज फायनान्सचे सर्वाधिक प्रकरणे केल्याबद्दल प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला आहे. मागील वर्षी देखील हा पुरस्कार ओम इलेक्ट्रॉनिक्सला मिळाला होता.
राहुरी फॅक्टरी व नुकत्याच राहुरी येथे सुरु झालेल्या ग्राहकांचे विश्वसनीय दालन असलेल्या ओम इलेक्ट्रॉनिक्स यांनी उन्हाळा महोत्सव कालावधीत ग्राहकांच्या सर्वाधिक फाइल्स केल्या आहेत.त्याबद्दल ओम इलेक्ट्रॉनिक्सचा प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला.
नुकत्याच राहुरी येथे सुरु झालेल्या ओम इलेक्ट्रॉनिक शाखेला देखील उदंड असा प्रतिसाद मिळत आहे.
ग्राहकांचे प्रेम व विश्वासामुळे हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया चोरडिया बंधू यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत