श्रीरामपुर मध्ये बळीराजा गौरव दिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपुर मध्ये बळीराजा गौरव दिन साजरा

  श्रीरामपूर(वेबटीम)  सम्राट बळीराजा स्मृतिदिनानिमित्त महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने श्रीरामपूरमध्ये बळीराजा गौरव दिन तसेच क्रांतीसु...

 श्रीरामपूर(वेबटीम)



 सम्राट बळीराजा स्मृतिदिनानिमित्त महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने श्रीरामपूरमध्ये बळीराजा गौरव दिन तसेच क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली.

    यावेळी सम्राट बळीराजा, लहुजी वस्ताद साळवे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे  पूजन करण्यात आले. या प्रसंगी बामसेफचे राज्य प्रचारक रमेश मकासरे, लाल निशान पक्षाचे कॉम्रेड जीवन सुरडे, शेतकरी संघटनेचे विठ्ठल दौंड, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक एस. के. चौदंते, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा महासचिव फ्रान्सिस शेळके यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन पर आपले मनोगत व्यक्त केले.

    याप्रसंगी बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते आर. एम. धनवडे, माजी नगरसेवक के. सी. शेळके, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा संघटक एस. के. बागुल, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष डॉ.अशोक शेळके, संभाजी ब्रिगेडचे संजय बोंबले, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे अमोल सोनवणे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रतीक जाधव, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे पास्टर राजेश कर्डक, संतोष गायकवाड, रवी बोर्डे, भारत शिंगे, राष्ट्रीय मूळनिवासी कर्मचारी संघाचे डॉ. सुरेश गवई, प्रोटानचे तालुकाध्यक्ष शाकीर शेख, बामसेफचे एन. डी. साळवे, बाबासाहेब थोरात, सर्जेराव देवरे, शाम रणपिसे, विजय जगताप, एम. एस. गायकवाड, बुद्धिस्टे इंटरनॅशनल नेटवर्कचे राजेश हिवाळे, भारतीय बौद्ध महासभेचे सी. एस. बनकर, प्रमोद शेळके यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत