राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील कै जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली सन 1983 शाळेच्या स्थापनेपासून आज 2023 पर्यंत विद्या...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील कै जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली सन 1983 शाळेच्या स्थापनेपासून आज 2023 पर्यंत विद्यालयात ऐतिहासिक असा विद्यार्थी मेळावा पार पाडला.
२००० साली असणारी दहावीची बॅच यांनी तब्बल 23 वर्षानंतर विद्यार्थी मेळावा घेऊन तब्बल 82 विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करून विद्यालयात टॉयलेट बाथरूम जुने झाल्यामुळे नवीन टॉयलेट बाथरूम साठी निधी गोळा करून सुमारे पाच लाख रुपये खर्चाचे टॉयलेट अंतिम टप्प्यात आलेले असून या विद्यार्थ्यांनी गावासाठी व शाळेसाठी नवीन आदर्श निर्माण केलेला आहे.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी मेळावा घेण्यात आला माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रथमतः मुलींनी मेळाव्यास हजर राहून नवीन आदर्श घालून दिला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य गोरे सर, गिरी सर, शिपाई राऊत व वाघ उपस्थित होते.
हकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काळे, लाटे, आरगडे ,गागरे ,पठारे ,मुसमाडे, हारदे, कातोरे, सोनवणे, भोसले ,वरपे, ठोंबरे ,शेलार, बागडे ,तांबे, राका व इतर विद्यार्थी प्रयत्नशील होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत