जिद्द व चिकाटी असल्यास माणसाला कोणतेही काम अशक्य नाही- कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिद्द व चिकाटी असल्यास माणसाला कोणतेही काम अशक्य नाही- कदम

  देवळाली प्रवरा (वार्ताहर)  देवळाली प्रवरा येथील सन. १९७९-८० या शैक्षणिक वर्षातील इ.१० वी मधील जगदीश पाटील मित्र मंडळ, देवळाली प्रवरा. माजी...

 देवळाली प्रवरा (वार्ताहर) 



देवळाली प्रवरा येथील सन. १९७९-८० या शैक्षणिक वर्षातील इ.१० वी मधील जगदीश पाटील मित्र मंडळ, देवळाली प्रवरा. माजी विदयाथ्यांचा १७ वे गेट टुगेदर (सस्नेह मेळावा) चालु वर्षी २०२३ मध्ये श्री बाळासाहेब लक्ष्मण पवार यांचे वस्तीवर दि. १५/११/२०२३ रोजी संपन्न झाला.त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. सत्यजीत कदम पाटील यांनी वरिल गौरव उद्‌गार काढले


सदरचे कार्यक्रमाचे प्रसंगी उदयोजक व दौंड शुगर कारखान्याचे चेअरमन श्री. जगदीश पाटील कदम यांचे चिरंजीव आर्यन यांनी २०० मिटर रनिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर एक रजत पदक व तीन सुवर्ण पदक मिळाल्या बद्दल त्यांचा पवार कुंटुंबियांच्या वतीने, दुस कुंटुंबाचे व जगदीश पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमांचे प्रसंगी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथील मंडलाधिकारी श्री. बाबासाहेव लक्ष्मण कदम यांनी देखील सर्व माजी विदयार्थ्यांचे गुणगौरव करुन मी जर आपल्या वर्गामध्ये असतो तर मी खुपच भाग्यशाली ठरलो असतो. कारण तुम्हाला जगदीश पाटील कदम यांचेसारखा वर्ग मित्र मिळाल्याने तुम्ही फार भाग्यशाली आहात. त्यांनी तुम्हा सर्वांना परदेश दौरा घडवून आणला त्याबद्दल त्यांचे मी आभार माणतो. असे मित्र असणे मी तुमचे परमभाग्य समजतो.


सदर कार्यक्रमास जगदीश पाटील मित्रमंडळाचे सर्वश्री. जगदीश पाटील कदम, बाळासाहेव दुस, भाऊसाहेब दुस, मधुकर कदम, दत्तात्रय कदम, रावसाहेब कदम, तुकाराम कदम, शंकर निमसे, सदाशिव तावरे, नामदेव उंडे, नानासाहेब कदम, बाळासाहेब कदम, सुभाष कदम, शिवाजी रहाणे, गोविंद टिक्कल, सुभाष पठारे, आदिनाथ तांबे, संजय कदम, दिलिप मुसमाडे, मधुकर कोळसे, जालिंदर मुसमाडे, सुर्यभान गडाख, वसंतराव कोळसे, अशोक हुडे इ. उपस्थित होते.


सदर कार्यक्रमास पवार कुंटुंबातील सर्व सदस्य व पाहुणे मंडळी श्री. धनजयराव काकडे, श्री. निखिल काकडे बीड तसेच श्री. अशोकराव देशमुख, श्री. सागर देशमुख ब्राम्हणी, श्री. विनायकराव काळे  नाशिक तसेच उदयोजक श्रीरामपूर येथील श्री. नानासाहेब तांबे. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. मुंकूंद दुस यांनी केले व आभार खंडाबा बु.चे सरपंच श्री. कैलास दिलिप पवार यांनी केले. याप्रसंगी जगदीश पाटील मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. हा मेळावा मोठ्या आनंदात सस्नेह भोजनाने पार पाडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत