राहुरी विधानसभा मतदारसंघातील 'या' ६ ग्रामपंचायतीस मिळणार नूतन इमारत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी विधानसभा मतदारसंघातील 'या' ६ ग्रामपंचायतीस मिळणार नूतन इमारत

  राहुरी(प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील ६ ग्रामपंचायत कार्यालयांच्या नवीन इमारत बांधकामांसाठी...

 राहुरी(प्रतिनिधी)



महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील ६ ग्रामपंचायत कार्यालयांच्या नवीन इमारत बांधकामांसाठीचा प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजुर केला होता. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या गतिमंद सरकारने सदर या कामासाठी विलंब लावला. सातत्याने पाठपुरावा करून आता या ६ कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील ६ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राहुरी तालुक्यातील केंदळ बु, तांभेरे, पाथर्डी तालुक्यातील शिराळ,कोल्हार, व आडगाव तसेच नगर तालुक्यातील जेऊर गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयास इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी १कोटी ८ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजने अंतर्गत १००० पेक्षा कमी / १००० ते २००० / २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या व स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यास शासनाने संदर्भीय शासन निर्णयान्वये सोबतचे परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या ग्रामपंचायतींना मंजुरी प्रदान केलेली आहे. यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचा हिस्सा ३.६० हजार व शासनाचे १४.४० हजार असे एकुण १८ लाख रुपये खर्चाचे बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार राहुरी तालुक्यातील केंदळ बु, तांभेरे, पाथर्डी तालुक्यातील शिराळ, कोल्हार, व आडगाव व नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे कामास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

 मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजनेंतर्गत सोबतचे परिशिष्टामधील नमुद ग्रामपंचायती संदर्भ क्र १, २ व ४ मधील नमुद तसेच संबधित ग्रामपंचायतीस ग्रामपंचायत कार्यालयास स्वतःची इमारत नाही, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामास पुरेशी जागा उपलब्ध असुन सदर जागेवर इमारत बांधकामास इतर कायदेशीर अडचणी नाही, सदर ग्रामपंचायतीस या किंवा अन्य योजनेतुन ग्रामपंचायत कार्यालय मंजुर नाही, लोकसंख्येच्या टप्प्याप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या मुल्यानुसार सदर ग्रामपंचायत स्व-निधी खर्च करण्यास तयार असुन त्याबाबतचा संबधित ग्रामपंचायतींने ग्रामसभा ठराव संमत केलेला आहे व संबधित ग्रामपंचायतीची लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार) या निकषांची पुर्तता करीत असलेबाबत गट विकास अधिकारी (संबधित पंचायत समिती) यांनी सादर केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत