घरातून रुसुन गेलेल्या मुलाचा पोलिसांकडून ६ तासात शोध! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

घरातून रुसुन गेलेल्या मुलाचा पोलिसांकडून ६ तासात शोध!

नगर(वेबटीम)  माझा मुलगा शाळेतून (साई भारत ठाकूर वय 13) शाळेतून कुठे तरी निघून गेला आहे.अशी माहिती आईने सांगताच  कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस...

नगर(वेबटीम)



 माझा मुलगा शाळेतून (साई भारत ठाकूर वय 13) शाळेतून कुठे तरी निघून गेला आहे.अशी माहिती आईने सांगताच  कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव  त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन त्वरित अंमलदारांची पथके नेमनुक करुन मुलाचा सहा तासात शोध लावला. सदर मुलाला आपल्या  पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पालकांसह नाते नातेवाईकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. केडगाव ( ता. नगर ) येथील साई भारत ठाकूर (वय 13 ) रा. निशा पॅलेस मागे, नगर पुणे रोड, केडगाव,अहमदनगर त्याच्या राहते घरातून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निघून गेला आहे. अशी माहिती कोतवली  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना प्राप्त झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तात्काळ मुलाचा फोटो आणि माहिती तयार करून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर  प्रसारित केली. त्यावरून  प्रसारित केलेली माहिती पाहून शिक्षकांनी अशी माहिती दिली की, सदरचा मुलगा हा कपडे घेऊन शाळेत आला होता. आणि तो आता घरी जाणार नाही. असे शेजारी बसलेल्या मुलाला सांगत होता. या सोबतच मुलाकडे  घरातील वापरत असलेल्या फोन मधील माहितीचे सुद्धा छाननी करण्यात आली. त्यामधून काही प्रमाणात माहिती मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार केली. त्यांच्या मदतीला मुलाच्या परिसरातील युवकांना सोबत घेतले. आणि साई भारत ठाकूर  याचा शोध सुरू केला. आदेशाप्रमाणे पोलिस अंमलदारांनी मुलगा  साई  याला अहमदनगर शहर व परिसरातील सर्वत्र शोध घेतला असता, तो मिळुन आल्यावर त्यास विचारले असता. त्याने परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून निघून जात असल्याचे सांगितले. त्याला  सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई ही मख्य पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई एस के दुर्गे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश धोत्रे, विश्वास गाजरे ,दीपक बोरुडे ,पो.ना. सलीम शेख , रवी टकले,  संदीप थोरात, सोमनाथ राऊत, अभय कदम, सचिन लोळगे, गणेश ढोबळे, सागर दुशिंगे, महेश पवार, दीपक मिसाळ, शिवाजी मेहेर, प्रशांत बोरुडे यांच्या पथकाने केली मुलाचा सहा तासात तपास लावून मुलाला पालकांच्या ताब्यात दिल्याने पालकांसह नातेवाईक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.   


पालकांनी आपल्या मुलांवर रागावताना मर्यादा ठेवाव्यात.सातत्याने मुलावंर चिड - चिड केल्याने मुले नको तो निर्णय घेत आहेत.त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबरोबर मैत्रीपुर्ण संवाद ठेवून उपाय योजना करण्याची गरज आहे.

 चंद्रशेखर यादव (पोलिस  निरिक्षक कोतवली पोलीस स्टेशन) नगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत