राहुरी(श्रीकांत जाधव) राहुरीत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावुन कर्तव्यदक्ष म्हणून ओळख निर्माण केलेले तहसीलदार एफ.आर.शेख सध्या बा...
राहुरी(श्रीकांत जाधव)
राहुरीत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावुन कर्तव्यदक्ष म्हणून ओळख निर्माण केलेले तहसीलदार एफ.आर.शेख सध्या बार्शी येथे सेवेत असून उद्या पंढरपूर येथे कार्तिकी वारी निमित्त जगाभरातून लाखो वारकरी पंढरीनाथाच्या दर्शनासाठी येत असतात. वारीदरम्यान वाकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाबरोबर, राज्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या देखील नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये बार्शीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार एफ. आर. शेख यांची नेमणूक करण्यात आली असून, सहकारी अधिकाऱ्यांसोबत चंद्रभागा नदी पात्रातील पाहणी करतानाचे छायाचित्र समोर आले आहे.
प्रशासकीय सेवेत काम करत असताना, पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे भाग्य मला लाभले असल्याचे तहसीलदार शेख यांनी 'आवाज जनतेचा' वेबपोर्टलशी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत