राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथे आज गुरुवारी विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या माध्यमातून आयुर्वेद जनजागृती व मोफत...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथे आज गुरुवारी विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या माध्यमातून आयुर्वेद जनजागृती व मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला.
प्रसादनगर येथील जि. प शाळेच्या आवारात पार पडलेल्या या शिबीरात विवेकानंद नर्सिंग होमचे प्राचार्य डॉ.विलास कड, अधीक्षक डॉ. पागिरे सर , हॉस्पिटल इंचार्ज डॉ.संदेश चोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या शिबिरात सर्व रोग निदान तसेच मोफत रक्त तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी हॉस्पिटल इनचार्ज डॉ.संदेश चोखर, डॉ. ज्ञानेश्वर पालवे,डॉ. शुभम सोनटक्के ,डॉ. प्राजक्ता गोपणारायान,डॉ.ऋषाली म्हस्के, डॉ. अनंत वारुळे,डॉ.अजय गावंडे,डॉ. वैभव इंगोले , डॉ. स्वाती झा आदिंसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत