कणगर येथील कणकावती माता कावडी घेऊन जाणाऱ्या भाविकांवर श्रीरामपुरात हल्ला गुन्हा दाखल... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगर येथील कणकावती माता कावडी घेऊन जाणाऱ्या भाविकांवर श्रीरामपुरात हल्ला गुन्हा दाखल...

राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील कणगर येथील कनकावती माता यात्रेनिमित्त पुणतांबा येथुन गंगेचे पाणी आणण्यासाठी आलेल्या कावडी वाल्यांना श्री...

राहुरी(वेबटीम):-

राहुरी तालुक्यातील कणगर येथील कनकावती माता यात्रेनिमित्त पुणतांबा येथुन गंगेचे पाणी आणण्यासाठी आलेल्या कावडी वाल्यांना श्रीरामपूर शहरातील सिंधी मंदिराच्या गेटसमोर  काही आरोपींकडून काल शनिवारी रात्री मारहाण करण्यात आली. काहीही कारण नसतांना कावडवाल्यांची टाटा जीप गाडी अडवुन हल्ला करुन,त्यांना लोखंडी रॅाड व दगडाने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

   या प्रकरणी श्री.अनिकेत राजेंद्र घाडगे,राहणार-कनगर,तालुका राहुरी यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या जिहादी प्रवृत्तींविरोधात आज दि.२६ /११/२०२३ रोजी ०१:५२ वा गुन्हा रजिस्टर नं.१२३५/२०२३ कलम ३२४,१४३ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये कुरेशी व शेख नामक आरोपी असल्याचे समजत आहे.

  सदर गुन्हा दाखल होण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात काल रात्री ८ वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडु असा इशारा कणगर ग्रामस्थांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत