37 व्या नॅशनल गेम मध्ये पारनेरची कन्या कु.वैशाली जिजाराम बांगर हिस रौप्यपदक ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

37 व्या नॅशनल गेम मध्ये पारनेरची कन्या कु.वैशाली जिजाराम बांगर हिस रौप्यपदक !

पारनेर प्रतिनिधी :श्रीकांत चौरे   कला - क्रीडा शैक्षणिक ,राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात आपल्या कलागुणाच्या बळावर दैदिप्यमान ...

पारनेर प्रतिनिधी :श्रीकांत चौरे




  कला - क्रीडा शैक्षणिक ,राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात आपल्या कलागुणाच्या बळावर दैदिप्यमान विजय संपादित करत पारनेर तालुक्याचे नाव साता समुद्रापार पोहोचविणारे अनेक हिरे या तालुक्याने राज्यासह देशाला दिले आहेत . त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही विविध खेळांमध्ये आपल्या गुणांचा ठसा उमटविणारे अनेक खेळाडूही या तालुक्यात जन्माला आले आहेत . त्यापैकीच महाराष्ट्र ऑलिंपिक मध्ये निवड समिती कडून राज्यातून 19 गुणवंत खेळाडूंच्या टिमची निवड करण्यात आली होती .महाराष्ट्राच्या या टीम मध्ये पारनेरची सुकन्या, कु.वैशाली जिजाराम बांगर ही होती. 5  ते 8 नोव्हेंबर रोजी गोवा येथे सुरू असलेल्या नॅशनल गेम्स मध्ये सिकई मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात कु.वैशाली जिजाराम बांगर हिने +70 किलो वरील वजनी गटामध्ये रौप्यपदक पटकावत आपल्या कर्तुत्वाची मोहोर अधोरेखित केली आहे .

           तिला अहमदनगर जिल्हा सिकई मार्शल आर्ट खेळाचे सचिव चंद्रकांत राहिंज सर यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले असुन ,

नुकत्याच झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघातील सर्व विजेत्या खेळाडूंना क्रीडामंत्री बनसोडे व महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर तसेच सिकई मार्शल आर्ट फेडरेशन ऑफ  इंडिया अध्यक्ष मीर नजीर सर यांनी विजेता खेळाडूंचे अभिनंदन करत क्रीडा क्षेत्रातील भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. राज्य पातळीवर उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुमारी वैशाली बांगर हिस महाराष्ट्र ऑलपिक कडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर झाले असून , उपस्थित सिकई मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मझहर खान ,महासचिव गायके सर या वेळी उपस्थित होते .

           भारतातील एक नामवंत स्पर्धा म्हणून ओळखले जानाऱ्या या स्पर्धेला. संपूर्ण भारतातील विविध राज्यांमधील खेळाडू सहभागी होत आसतात . क्रीडा क्षेत्रात राज्यपातळीवर यश संपादित करणारी खेळाडू वैशाली हिस मा.चंद्रकांत राहिंज सरांचे मार्गदर्शन लाभले असुन राज्याला अनेक सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या संकल्प स्पोर्ट्स फाऊंडेशनची ही विद्यार्थिनी आहे.कुमारी वैशाली बांगर हिच्या या यशाबद्दल पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनीही वैशालीचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा .पारनेर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत