श्रीरामपूर(वेबटीम) भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने शाळा, शिक्षण बचाव, खाजगीकरण, कंत्राटीकरण हटाव अभियाना अंतर्गत, सत्यश...
श्रीरामपूर(वेबटीम)
भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने शाळा, शिक्षण बचाव, खाजगीकरण, कंत्राटीकरण हटाव अभियाना अंतर्गत, सत्यशोधक स्थापना दिनाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, राष्ट्रपिता ज्योतीराव फुले स्मृतिदिन व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनानिमित्त अहमदनगर जिल्हास्तरीय सत्यशोधक संमेलन रविवारी (दि. ०३) नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १०.०० वा. ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत आयोजित केले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.
सदर संमेलनाचे उदघाटन विधान परिषदेचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षता भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ हे करणार आहेत. तर विशेष अतिथी छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाचे शिरीष कांबळे हे असणार आहेत. यावेळी अ. भा. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, आदर्श बहुजन शिक्षक संघाचे राज्य महासचिव पी. एस. निकम, क्रांतीवीर भगतसिंग ब्रिगेडचे राज्य संघटक जीवन सुरडे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे जिल्हा संयोजक अनिल पावटे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जाकीर सय्यद, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण वाघमारे हे वक्तागण मार्गदर्शन करणार आहेत.
या संमेलनात सत्यशोधक समाज स्थापने मागील उद्देश, सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे, ६२ हजार शाळांचे खाजगीकरण आणि कंत्राटी नोकरी भरती हे महाराष्ट्र सरकारचे बहुजन समाजाला गुलाम बनविण्याचे षडयंत्र, जातीनिहाय जनगणना करणार नाही केंद्र सरकार व महाराष्ट्रात शासनाच्या षड्यंत्राचा पर्दाफाश अशा विविध ज्वलंत विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन आयोजित केले आहे.
तरी मूलनिवासी बहुजन समाजामधील एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, लिंगायत, महिला, विद्यार्थी, युवा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय संसारे, महासचिव फ्रान्सिस शेळके, संघटक सुधाकर बागुल, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विशाल गायकवाड, सिद्धार्थ गारोळे,कुमार भोरुंडे,डॉ. अशोक शेळके, प्रभाकर ब्राह्मणे आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत