राहुरी(वेबटीम) श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर येथे कार्तिक पौर्णिमा उत्सवनिमित्त महंत अरुणनाथगिरीजी महाराजांनी कीर्तन सेवेचे पु...
राहुरी(वेबटीम)
श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर येथे कार्तिक पौर्णिमा उत्सवनिमित्त महंत अरुणनाथगिरीजी महाराजांनी कीर्तन सेवेचे पुष्प गुंफले.खऱ्या अर्थाने हरिपाठ मालिकेवर कीर्तन सेवा चालू असताना हरिपाठ ग्रंथातील पाचव्या क्रमांकाचा अभंग महाराजांनी घेतला होता. योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी | वायाची उपाधी दंभधर्म | या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील अभंगावर अरुणनाथगिरीजींनी अत्यंत सुंदर निरूपण केले. संत सानिध्यात गेल्याशिवाय मानवी जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. त्यासाठी संत संगत महत्त्वाची आहे.संत संग जया जैसा-लाभ तया तैसा,असा उपदेश महाराजांनी केला.
महाराज पुढे म्हणाले जीवनामध्ये योग,याग,विधी, प्रत्याहार, यम,नेम, साधना, प्राणायाम, ध्यान, इत्यादी साधने योगाचे आहेत. परंतु या सर्व गोष्टींनी भगवंतप्राप्ती होईलच याची शाश्वती नाही. म्हणून ज्ञानोबारायांना म्हणावं लागले योग याग विधी येणे नव्हे सिद्धी | मग याने होते काय ? तर अहंकार अभियान मी पणा दंभ हे वाढत असल्यामुळे वायाची उपाधी दंभधर्म | ज्ञानोबा राय म्हणाले हे सर्व व्यर्थ साधने आहेत. मग देवापर्यंत जाण्याकरता भक्ती- भावाशिवाय देवापर्यंत जाता येत नाही. म्हणून भावेविन देव नकळे नि:संदेह l गुरुविण अनुभव कैसा कळे | गुरु विना अनुभव कळूच शकत नाही. गुरु शिवाय भवसागर तरू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात,माझ्या जीवनामध्ये सद्गुरु नारायणगिरी महाराज यांची कृपा झाली. त्यांच्या चरणांची सेवा बारा वर्षे मला घडली.सरला बेट या ठिकाणी मी विद्या अध्ययन करत असताना, गोदावरीच्या रम्य परिसरात सद्गुरु नारायणगिरी महाराजांची कृपा झाली. त्यांनी अनेक सूत्र -ज्ञान दिले. ज्ञानाचे सूत्र देत असताना,गीता भागवत-रामायण अनेक ग्रंथांचे तत्वज्ञान हे खऱ्या अर्थाने नारायणगिरी महाराजांनी मला दिले, असा मनाचा मोठेपणा दाखवून, आपला जीवन प्रवास अरुणाथगिरीजींनी सांगितला. एकंदरीत नारायणगिरी महाराजांच्या आशिर्वादामुळेच अडबंगनाथ संस्थांची निर्मिती झाली. सद्गुरु नारायणगिरी महाराजांचे प्रिय शिष्य जनार्दन राजाराम बाबा मुठे हे महाराजांचे अत्यंत जिवलग भक्त होते. त्यांनीच मला २००१साली भामाठाणला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आणून अडबंगनाथ संस्थानची मुहूर्त मेढ रोवली, असे महाराज म्हणाले. अडबंगनाथ मंदिराची पायाभरणी २००३ साली झाली. अल्पावधीत हे देवस्थान नावारूपास आले.याला कारण सद्गुरु नारायणगिरी बाबांची कृपा व मुठे बाबांच्या योगदानामुळे हे शक्य झाले, असे अरुणाथगिरीजी महाराज म्हणाले. मुठे बाबांचे चिरंजीव श्री.भाऊसाहेब जनार्दन मुठे व समस्त मुठे पाटील परिवाराच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांच्या आरोग्यासाठी संस्थानच्यावतीने सर्व रोगनिदान शिबिर डॉ.सौरभ कुटे यांनी आयोजित केले होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, टेमकरसाहेब, कणसेदादा, साबदेदादा, विश्वमनी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश गोपाळे, पत्रकार शिवाजी झावरे,बबनराव कुटे, दत्तात्रय कुटे, मुळेसाहेब, संजय चौधरी, बाळासाहेब सालपुरे, आप्पासाहेब गायकवाड, तीरसे काका,कसार मॅडम,विणेकरी रमेश महाराज पारखे, गोरख महाराज वरपे, संजय महाराज बनसोडे,अशोक महाराज मुठे, लखनगिरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज काकडे,सार्थक महाराज बडोगे, प्रेमनाथ महाराज, धर्मनाथ महाराज काकड आदीं भाविक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत