राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष तथा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा संचालक सत्यजित चंद्रशेखर कद...
राहुरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष तथा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा संचालक सत्यजित चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी देवळाली प्रवरा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवळात प्रवरातील शांताबाई कदम सांस्कृतिक भवनात उद्या सोमवारी सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर १० वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यातर प्रा.गणेश शिंदे यांचे व्याख्यान संपन्न होणार असून याचवेळी नगरपालिका सफाई कामगारांना थंडीपासून बचाव व्हावा या हेतूने साहित्य वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.,
तरी या कार्यक्रमाचा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सत्यजित कदम फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत