राहुरी फॅक्टरी(वेबटिम) राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या ३० व्या वर्धापनदिन व दीपावलीनिमित्ताने सभासदांना ठेव व लाभांश व कर्मच...
राहुरी फॅक्टरी(वेबटिम)
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या ३० व्या वर्धापनदिन व दीपावलीनिमित्ताने सभासदांना ठेव व लाभांश व कर्मचाऱ्यांना बोनस वाटप उद्या शनिवार दि ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन विष्णुपंत गीते यांनी दिली.
छोट मोठे व्यवसायिक, शेतकरी, कष्टकरी यांना गेल्या ३० वर्षांपासून आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याचे काम सुरू असून संस्था ३१ व्या वर्षात पदार्पण करीत असून वर्धापनदिनानिमित्त शनिवार ४ नोव्हेंबर रोजी सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळी सणानिमित्त उद्या शनिवार ४ नोव्हेंबर रोजी महंत उद्धव महाराज मंडलीक यांच्या हस्ते सभासदांना ठेव व लाभांश वाटप तसेच कर्मचाऱ्यांना बोनस वाटप संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन विष्णुपंत गीते, व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज व संचालक मंडळाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत