श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा महंत रामगिरीजी ...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा महंत रामगिरीजी महाराज मठाधीपती सरला बेट यांच्या शुभहस्ते ३नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. तसेच सदर कार्यक्रमाचा शुभारंभ १ नोव्हेंबर पासून सुरू असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .
याबाबत माहिती अशी की श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे मंदिर गावकऱ्यांच्या व भक्तांच्या सहकार्याने साकारले जात आहे या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलशारोहण सोहळा परमपूजनीय सरला बेट येथील मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी होणार आहे या निमित्ताने महंत रामगिरीजी महाराज यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे व त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे बुधवार दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी विधिवत पूजा व सायंकाळी हरिपाठ आयोजित करण्यात आलेले होते तसेच गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विधीवत पूजा व हरिपाठ आयोजित करण्यात आलेले होते.शुक्रवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते बारा या कालावधीत प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आयोजित केले गेलेला आहे या कार्यक्रमास पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समितीचे सदस्य समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तरुण मंडळ भक्त मंडळ कुरणपूर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत