कानिफनाथ शेतकरी दूध उत्पादक समूहाच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याचे काम - शिंदे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कानिफनाथ शेतकरी दूध उत्पादक समूहाच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याचे काम - शिंदे

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) शेतकरी दूध उत्पादकांना कानिफनाथ शेतकरी दूध उत्पादक समूहाच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याचे काम केले जात असल्याचे ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



शेतकरी दूध उत्पादकांना कानिफनाथ शेतकरी दूध उत्पादक समूहाच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याचे काम केले जात असल्याचे प्रतिपादन भैरवनाथ उद्योग समूहाचे संचालक किरण शिंदे यांनी केली.


 राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील शेतकऱ्यांनी बचत समूहाच्यामाध्यमातून सुरू केलेल्या कानिफनाथ शेतकरी दूध उत्पादक समूहाच्यावतीने शेतकऱ्यांना ठेव व रिबीट वाटप करण्यात आले.प्रसंगी श्री.शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, कांदा व्यापारी तुळशीराम कडू, कृषी सहायक काशिनाथ आडभाई आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्तविक व्यवस्थापक जगन्नाथ वरखडे यांनी केले.


 यावेळी वर्षभरात सर्वाधिक दूध टाकणारे पाच दूध उत्पादकांना भेटवस्तू व ठेव रिबीट धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच दूध उत्पादकांना ५० किलो प्रति व्यक्ती साखर वाटप करण्यात आली. व १ रू. प्रती लिटरप्रमाणे रीबिट वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, सुनील विश्वासराव, देवळाली सोसायटीचे चेअरमन संतोष चव्हाण, व्हा. चेअरमन सूर्यभान गडाख, शहाजी कदम, राजेंद्र ढुस, माऊली वाणी, बाळकृष्ण महाराज खांदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


 यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेअरमन दत्तात्रय वरखडे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब रंगनाथ आरंगळे, संचालक  मंजाबापु वरखडे,प्रभाकर वरखडे, गोरख कदम,अजित वरखडे,वसंत वरखडे, गणेश वरखडे,आदिनाथ वाणी,दत्तात्रय देठे,अमोल वरखडे, संभाजी वरघुडे, व्यवस्थापक जगन्नाथ वरखडे, आदींनी अथक प्रयत्न घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत