राहुरी(वेबटीम) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथील ...
राहुरी(वेबटीम)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्यासह संचालक मंडळाने आज राहुरी बाजार समिती आवारात लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अरुण तनपुरे व संचालक मंडळाने उपोषण सुरू केले आहे.
यावेळी तहसीलदार चंद्रजीत रजपूत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवा नेते हर्ष तनपुरे , सर्व संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाज बांधव तसेच आडत व्यापारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत