राहुरी(वेबटिम) २१ ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील मानोरी येथील लक्ष्मण रामचंद्र खामकर हे त्यांची पत्नी मुलगी अन् ते बाहेरगावी गेले असता त्...
राहुरी(वेबटिम)
२१ ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील मानोरी येथील लक्ष्मण रामचंद्र खामकर हे त्यांची पत्नी मुलगी अन् ते बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरी त्यांची वृद्ध आई एकटीच असल्याचा फायदा घेत मोटर सायकलवरून आलेल्या अज्ञात दोन भामट्यांनी बंगल्याची बेल वाजवून थेट घरात प्रवेश करत वृद्ध सरूबाई खामकर यांच्या तोंडात बोळा कोंबत गंभीर मारहाण केली. सदर मारहाणीत वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्या भामट्यांनी तेथून धूम ठोकली.
या घटनेचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ सुरु करून तांत्रिक विश्लेषणाच्या व इतर पुराव्याच्या आधारे कोल्हार येथील रोहित एकनाथ कानडे व चिंचोली फाटा येथील गणेश सुनिल लोंढे या तरुणांनीच सदर जबरी चोरी केल्याचे निष्पन्न होताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पथकाने आरोपी मुख्य आरोपी रोहित एकनाथ कानडे व गणेश सुनिल लोंढे याला शिताफीने अटक केली.
आरोपी रोहित एकनाथ कानडे हा खामकर यांचा नातेवाईक असल्याची परिसरात चर्चा होती त्यामुळे सदर चोरी मागचा उद्देश काय होता कि आणखी काही याचा खुलासा आरोपी रोहित एकनाथ कानडे याच्या कडून लवकरच राहुरी पोलीस करतील.
आरोपी गणेश सुनिल लोंढे याला राहुरी न्यायालयासमोर हजार केले असता त्याला ३ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे .
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक कटारे, पोलीस हवालदार जायभाय, पोलीस नाईक राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, महेश शेळके व सचिन ताजने यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत