देवळाली प्रवरा(वेबटीम) सकल मराठा समाज देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी यांच्यावतींर उद्या सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर पासून मराठा आरक्षण मिळणार ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
सकल मराठा समाज देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी यांच्यावतींर उद्या सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर पासून मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण देवळाली बाजार तळावर सुरू करण्यात येणार आहे.
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील मराठा समाज बांधव उद्या सोमवारी सकाळी १० वाजता प्रशासनास निवेदन देऊन व त्यानंतर राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृति पुतळयास पुष्पहार अर्पण करुण उपोषणास प्रारंभ करणार आहेत.
देवळाली प्रवरा बाजारतळ स्टेजवर होणाऱ्या साखळी उपोषणास मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत