राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिचविहिरे येथील शेतकरी दगडू भागवत गिते यांना स्वामित्व योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिचविहिरे येथील शेतकरी दगडू भागवत गिते यांना स्वामित्व योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सनद प्रदान करण्यात आल्याने चिंचविहिरे परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.
शिर्डी येथे पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात हि प्रातिनिधीक स्वरूपात सनद त प्रदान करण्यात आली.
चिचविहिरे सारख्या लहानशा गावातील एका शेतकरी कुटुंबातील सर्व सामन्य हा सन्मान मिळाला हे. भाग्य मला लाभले आहे. यामुळे आता गावठाणात राहणार्या प्रत्येकाला स्वतः राहत असलेल्या जागेचे स्वामित्व मिळणार आहे. हे फक्त राज्यातील महायुतीसरकारमुळे शक्य झाले आहे. यासाठी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील, खा. डॉ. सुजय विखेपाटील व माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या होते.दुरदृष्टिकोनातून शक्य झाले आहे, असे दगडू गिते यांनी सांगीतले. कार्यक्रमास चिंचविहिरे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत