आंबी (वेबटीम) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) परीक्षेत चांदेगाव येथील प्रगतशील शेतकरी व केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द भाग शाळा आं...
आंबी (वेबटीम)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) परीक्षेत चांदेगाव येथील प्रगतशील शेतकरी व केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द भाग शाळा आंबी चे पर्यवेक्षक श्री चंद्रकांत भांड सर यांची कन्या असून डॉ अक्षता या क्लास वन श्रेणी मध्ये उत्तीर्ण होऊन त्यांची पशुधन विकास अधिकारी कृषी, पशुसंर्वधन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र अधिकारी पदावर निवड झाली आहे.
डॉ अक्षता यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद प्राथमिक शाळा चांदेगाव येथे व माध्यमिक शिक्षक केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द व चंद्रेश्वर माध्यमिक विद्यालय चांदेगाव येथे पूर्ण झाले असून मधामिक शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्यादृष्टीने कठोर मेहनत ,परिश्रम घेवून त्यांनी आपले हे स्वप्न पूर्ण केले .
चांदेगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन पहिल्याच प्रयत्नात MPSC परिक्षेत यश संपादन केल्यामुळे डॉ अक्षता यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत