सात्रळ(वेबटीम) पंचक्रोशीतील धानोरे गावचे सरपंच श्याम माळी हे काही दिवसापूर्वी नामदार विखे प्रणित जनसेवा मंडळातून इतर पक्षात गेले होते....
सात्रळ(वेबटीम)
पंचक्रोशीतील धानोरे गावचे सरपंच श्याम माळी हे काही दिवसापूर्वी नामदार विखे प्रणित जनसेवा मंडळातून इतर पक्षात गेले होते. मनातील गैरसमज दूर झाल्याने त्यांनी आज पाथरे बु ! येथे खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत परत विखे प्रणित जनसेवा मंडळात स्वगृही परत प्रवेश केला. या प्रसंगी ग्रामस्थांतर्फे खा. सुजयदादा विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी धानोरे गावचे ग्रामस्थ किरण दिघे, सुभाष दिघे, रंगनाथ शिंदे, गोकुळ दिघे, शहाजी दिघे अमित दिघे अक्षय बाळासाहेब दिघे, पांडुरंग दिघे,राहुल दिघे, जनसेवा कार्यालयाचे प्रदीप दिघे व इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत