आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या केसापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अखिल भारतीय समता परिषदेचे जिल...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या केसापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब मेहेत्रे यांच्या धर्मपत्नी सुशिलाताई मेहेत्रे यांची निवड झाली. यावेळी सरपंच पदासाठी तब्बल चार अर्ज आल्याने मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यापैकी दोन अर्ज माघारी घेतल्याने राहुरी बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार यांनी उमेदवार दिलेल्या सचिन टाकसाळ यांचा ०५-०४ अशा फरकाने पराभव झाल्याने सुशिलाताई दादासाहेब मेहेत्रे यांचा विजय होऊन सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
यासाठी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गुलाबराव डोखे, माजी उपसरपंच दिपक पवार, माजी सरपंच गोकुळ कारभारी टाकसाळ, सोसायटीचे चेअरमन ललित सुदाम टाकसाळ, विलास रामभाऊ टाकसाळ, संदिप विनायक टाकसाळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव मेहेत्रे, ग्रामपंचायत सदस्य कांचन रणदिवे, अनिल बोधक, मीनाक्षी मेहेत्रे, विलास रणदिवे आदींनी विजयश्री खेचून आणली.
या निवडीप्रसंगी धनंजय मेहेत्रे, चंद्रकांत टाकसाळ, भाऊसाहेब डोखे, अनिल मेहेत्रे, मधुकर सर रणदिवे, बाळकृष्ण मेहेत्रे, अशोक मेहेत्रे, बाळासाहेब मेहेत्रे, पोपट मेहेत्रे, भाऊसाहेब मेहेत्रे, कुंडलिक रणदिवे, भारत रणदिवे, रंगनाथ मेहेत्रे, नानासाहेब रणदिवे, रावसाहेब रणदिवे, संजय भोसले, ज्ञानेश्वर रणदिवे, बाबासाहेब रणदिवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत