Rahuri(वेबटीम) सायबर गुन्ह्याचे प्रकार वाढत असून नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये, यासाठी मोबाईल हाताळताना सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पोलिस ...
Rahuri(वेबटीम)
सायबर गुन्ह्याचे प्रकार वाढत असून नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये, यासाठी मोबाईल हाताळताना सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव म्हणाले की,नागरिकांकडून सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईलचा वाढलेला वापर तसेच ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण यातून सायबर गुन्हे घडत आहेत. काही वेळा सायबर चोरांकडून होत असलेल्या फसवणुकीची कल्पना येत नाही व मोठी फसवणूक होते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या क्रमांकावर आलेली मेल किंवा लिंकवर क्लिक करु नये, कोणतेही लोन ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नये, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत ओळख वाढवू नये, कोणालाली बॅंकची वैयक्तीक माहिती शेअर करु नये.
मोबाइलचा वापर अनावश्यक अपलोड किंवा डाउनलोडसाठी करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.
ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ बॅंकेशी संपर्क करुन अकाऊंट बंद करावे तसेच डेबिट फ्रीज करावे. फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत