जिल्हयातील ९६ मंडलांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्हयातील ९६ मंडलांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहिर

मुंबई  : विशेष  प्रतिनिधी       नगर जिल्हयातील ९६ मंडलांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहिर केली असून या मंडलांमध्ये दुष्काळाच्...

मुंबई  : विशेष  प्रतिनिधी



      नगर जिल्हयातील ९६ मंडलांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहिर केली असून या मंडलांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभुमीवर देण्यात येणाऱ्या सवलती मिळणार आहेत. आमदार नीलेश लंके यांनी यासंदर्भात संपूर्ण जिल्हयासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.



     नगर जिल्हयातील एकाही तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्याने आ. नीलेश लंके यांनी त्याविरोधात आवाज उठविला होता. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांची भेट घेऊन त्यांनी आपला अभ्यासपुर्ण अहवाल सादर केला होता. आ. लंके यांची माहीती पाहून त्यावेळी जिल्हाधिकारीही आवाक झाले होते. जिल्हयावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आ.लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचेही जाहिर केले होेते. गुरूवारी आ. लंके यांनी मदत  व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन जिल्हयाच्या स्थितीविषयी अवगत केले होते. त्याच वेळी पाटील यांनी काही मंडलांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत सामवेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

मंत्रालयात गुरूवारीच पार पडलेल्या मंत्रीमंडळ उपसमीतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे आ. लंके यांनी सांगितले. या बैठकीस अनिल पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे, गिरीष महाजन , धनंजय मुुंडे,  संदीपान भुमरे या मंत्रयांसह मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त सचिव सोनिया शेट्टी उपस्थित होत्या.


     नगर जिल्हयात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या खाजगी यंत्रणेनेच्या  अहवालात चुकीची माहीती देण्यात आल्याने नगर जिल्हयातील एकाही तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करण्यात  आला नव्हता. ही बाब आ. लंके यांनी अभ्यासासह निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या समितीने आ. लंके यांच्या मागणीचा विचार करून समितीने १४ तालुक्यातील ९६ महसूल मंडलांचा दुष्काळ सदृश परिस्थितीच्या यादीत समावेश करण्यात आला.



दक्षिणेतील या मंडलांमध्ये दुष्काळसदृश स्थिती


पारनेर : पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, निघोज, टाकळीढोकेश्‍वर, पळशी.

नगर : नालेगांव, सावेडी, कापूरवाडी, केडगांव, भिंगार, नागापूर, जेऊर,  चिंचोंडी पाटील, वाळकी, चास, रूई छत्तीशी,   विरगांव, समशेरपुर.

जामखेड : आरणगांव, खर्डा, नान्नज, नायगांव.

कर्जत : राशिन, भांबोरा, कंबोळी, मिरजगांव, माहीजळगाव

पाथर्डी : मणिकदौंडी, टाकळीमाणूर, करंजी, मिरी

शेवगांव : भातकुडगांव, बोधेगांव, बोधेगांव, चापडगांव, ढोरजळगांव, एरंडगांव.

श्रीगोंदे : श्रीगोंदे, काष्टी मांडवगण,  बेलवंडी, पेडगांव, चिंभळे, देवदैठण, कोळगांव.


उर्वरीत मंडळांसाठीही प्रयत्न


नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मंडळांमध्ये  दुष्काळ सदृश स्थिती जाहिर झाली नसून तिथे दुष्काळ सदृश स्थिती जाहिर करण्यासाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत.


नीलेश लंके

 आमदार  


निर्णय झाल्यानंतर श्रेय घेण्याचा प्रयत्न


दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पारनेर तालुक्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्यामुळे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडून जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला.  मंत्री पाटील यांची गुरुवारी आ. लंके यांनी भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय दुपारच्या बैठकीत घेऊ अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली होती. मंत्री पाटील यांनी दिलेल्या ग्वाहीप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जिल्ह्यातील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश झाला. हा समावेश झाल्यानंतर काही लोक त्याचे श्रेय घेऊ पाहत आहेत. जे आज श्रेय घेऊ पाहत आहेत, त्यांनी यापूर्वी काय पाठपुरावा केला याची माहिती पुराव्यासह जनतेला दिली पाहिजे. किती दिवस तुम्ही जनतेला भुलविनार आहात ? 


बाबाजी तरटे

सभापती बाजार समिती


बापूसाहेब शिर्के 

उपसभापती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत