दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले 'हे'आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले 'हे'आवाहन

  राहुरी(प्रतिनिधी) दिवाळी सण मोठ्या आनंदाने साजरा होत असताना नागरिकांनी बाजार पेठेत खरेदी करताना तसेच दिवाळी सुट्टीसाठी गावाकडे अथवा इतर ठि...

 राहुरी(प्रतिनिधी)



दिवाळी सण मोठ्या आनंदाने साजरा होत असताना नागरिकांनी बाजार पेठेत खरेदी करताना तसेच दिवाळी सुट्टीसाठी गावाकडे अथवा इतर ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.


 याबाबत आवाहन करताना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव म्हणाले  की, दिवाळी सणानिमित्त राहुरी शहरासह तालुक्यातील अनेक गावांत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याचवेळी नागरीक, महिला खरेदीसाठी बाजारात जात असतात त्यावेळी मौल्यवान वस्तू, पैसे व्यवस्थित सांभाळावेत. एटीएममधून किंवा बँकेतून पैसे कढल्यानंतर रेकी करून तुमचा कोणी पाठलाग करत आहे की काय? यावर लक्ष देणे आवश्यक आहे, तसे काही जाणवल्यास तातडीने राहुरी पोलिसांशी तातडीने संपर्क करा.बाजारामध्ये खरेदीसाठी जाताना दुचाकी अथवा चारचाकी वाहन पार्किंग करताना सीसीटीव्ही ठिकाणी किंवा अधिकृत पार्किंग स्थळी वाहन लावावेत. 





दिवाळी निमित्ताने ॲानलाईन खरेदी करताना कमी किमतीमध्ये वस्तू देतो असे सांगून फसवणूकीची काही संकेतस्थळ प्रसारित भामट्यांकडून प्रसारित केली जात आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर व्यक्तीने बँकेची माहिती भरल्यास खातेच भामट्यांकडून रिक्त केले जाते. त्यामुळे अशा फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.


दिवाळी सुट्टीमुळे गावी किंवा अन्य ठिकाणी नोकरदार, माहेरी जाणाऱ्या विवाहिता आदींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हे करताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या घरात जास्त रोख रक्कम किंवा दागिने व इतर किंमती ऐवज जास्त ठेवू नये, ठेवला तर तो सुरक्षित ठेवावा तसेच आपल्या घराच्या आजुबाजूला राहणाऱ्यांना कल्पना देणे गरजेचे आहे. 


बसस्थानक, रेल्वे स्थानक, थांबे आदी ठिकाणी प्रवाशांची गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन पर्स, पॉकेट, दागिने, बॅग लंपास करण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीत गेल्यानंतर नागरिकांनी काळजी घ्यावी. एखादी व्यक्ती संशयीत वाटल्यास तात्काळ राहुरी पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत