आर्थिक विकासात प्रेरणा विकास सोसायटी-पतसंस्था व मल्टिस्टेटचे योगदान- राष्ट्रीय संघ व इफकोचे अध्यक्ष दिलीप संघानी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आर्थिक विकासात प्रेरणा विकास सोसायटी-पतसंस्था व मल्टिस्टेटचे योगदान- राष्ट्रीय संघ व इफकोचे अध्यक्ष दिलीप संघानी

  राहुरी(वेबटीम) आर्थिक विकासात प्रेरणा विकास सोसायटी ,पतसंस्था व मल्टीस्टेटचे योगदान मोठे आहे. सहकारी विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून ग्रा...

 राहुरी(वेबटीम)



आर्थिक विकासात प्रेरणा विकास सोसायटी ,पतसंस्था व मल्टीस्टेटचे योगदान मोठे आहे. सहकारी विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला  मोठी गती मिळू शकते. यासाठी सहकारी विकास सोसायटी   अधिकाधिक समर्थ  झाली पाहिजे असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय संघ व इफकोचे अध्यक्ष   माजी खासदार दिलीप संघानी  यांनी व्यक्त केले.


 गुहा येथील प्रेरणा पतसंस्था ,प्रेरणा विकास व प्रेरणा मल्टीस्टेटच्या कार्यालयास माजी  खासदार व गुजरातचे माजी कँबिनेटमंत्री श्री दिलीप भाई संघानी यांनी  सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पतसंस्थेच्या डॉ दादासाहेब तनपुरे सभागृहात आयोजित  सत्कार समारंभात ते बोलत होते.


माजी  खासदार दिलीप संघानी पुढे म्हणाले की ,सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात व गुजरात मोठे काम झाले आहे .त्यातून लोकांच्या आर्थिक समस्या सुटण्यास मदत झाली. गावोगाव सेवा सोसायटीचे विकासाचे   चांगले माँडेल उभे राहिले पाहिजे. सहकार चळवळीकडे विशेषतः गाव पातळीवरील विकास सेवा संस्थेकडे  केंद्र शासनाचे  विशेष लक्ष आहे. केंद्र शासनाला सहकारी सोसायटीच्या मजबुतीकरणातून ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक चालना देण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे धोरण आहे. या दृष्टीने गावोगाव सहकारातील नेतृत्वाने पुढे आले पाहिजे. गाव पातळीवर मी देखील सेवा सोसायटीच्या माध्यमातून माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली.सहकार विभागाच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत सहकार विभागांच्या  योजना पोहोचविल्या पाहिजेत.प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन दिलीप संघानी यांचा  सत्कार केला.


प्रेरणा पतसंस्था उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरूळे प्रेरणा सोसायटी उपाध्यक्ष अशोक उर्हे ,प्रेरणा मल्टिस्टेट उपाध्यक्ष प्रा. वेणुनाथ लांबे ,नकुल कडु ,सुमित उर्हे, जालिंदर वर्पे ,बबननाना कोळसे, भाऊसाहेब कोळसे, सुभाष कोळसे ,राजेंद्र गांडूळे ,लालजी आंबेकर ,वेंदात कपाळे,सिध्दार्थ वाबळे  रविंद्र शिंदे ,अशोक सौदागर प्रशांत वाबळे व  सभासद व ग्रामस्थ या वेळी  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत