देवळाली प्रवरा (वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंबीस्टोअर येथे नाताळ सणाचे औचित्यनिमित्त दरवर्षीप्रमाणे उद्या शनिवार दि. 3...
देवळाली प्रवरा (वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंबीस्टोअर येथे नाताळ सणाचे औचित्यनिमित्त दरवर्षीप्रमाणे उद्या शनिवार दि. 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ११.३० वाजता स्नेहमेळावा व सस्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११.०० वाजता धर्मगुरू फा. भाऊसाहेब संसारे यांच्या प्रमुख उपस्थित धार्मिक विधी व प्रवचन होईल, अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या कार्यक्रमास देवळाली प्रवरा शहर व पंचक्रोशीतील सर्वांची उपस्थिती असते.
कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल व या कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकतीच झी मराठी वाहिनीवर पार पडलेल्या सारेगमप लिटल चॅंप स्पर्धेतील विजेती गौरी पगारे आणि उपविजेता जयेश खरे या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्यांचा सत्कार केला जाणार आहे.
तरि या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत