तांदुळवाडी (प्रतिनिधी) महाभारतातील श्रीकृष्ण व अर्जुन यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे परंतु एकलव्य व कर्ण यांचा इतिहास फार कमी लोकांना माह...
तांदुळवाडी (प्रतिनिधी)
महाभारतातील श्रीकृष्ण व अर्जुन यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे परंतु एकलव्य व कर्ण यांचा इतिहास फार कमी लोकांना माहिती असतो म्हणून वंचित घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करणारे दुर्मिळ असतात असे प्रतिपादन आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.
राहुरी येथे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने आरोग्यदूत डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार वसंतराव झावरे होते.
यावेळी बोलताना डॉ. शेटे म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेमुळे राज्यात सर्वत्र जावे लागते. वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार समारंभ होतात परंतु राहुरी येथील हा सन्मान हा घरचा सन्मान आहे असे वाटते. कारण वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करणारा आरोग्य दूत हा राहुरीत आहे. पुढील काही दिवसांत आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे स्वरूप बदलून सर्वसामान्य नागरिकांना अजून काही लाभ देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे यांनी प्रास्तविक करून डॉ. शेटे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी योजनेच्या लाभार्थ्यांना आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले तसेच योजनेच्या लाभाचे पत्र देण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक रविंद्र म्हसे, ऋषिकेश शेटे, ऍड.भाऊसाहेब पवार, अनिल माळी, शाम माळी, समीर पठाण, सचिन पवार, कृष्णा गायकवाड, दशरथ बर्डे, बाळासाहेब शिंदे, जनार्दन माळी, समीर शेख, आर.आर.जाधव, मन्सूर शेख, रिहान शेख, रविंद्र कोळी, अक्षय बर्डे, विकास माळी, जितेंद्र बर्डे आदींसह लाभार्थी व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन समीर पठाण यांनी केले तर रविंद्र म्हसे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत