राहुरी(वेबटीम) राहुरी तालूक्यातील टाकळीमिया येथील शिक्षक प्रतिनिधी छाया हारदे यांची नूकतीच अहमदनगर जिल्हा कलाध्यापक अध्यक्ष महिला आघाडी या प...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालूक्यातील टाकळीमिया येथील शिक्षक प्रतिनिधी छाया हारदे यांची नूकतीच अहमदनगर जिल्हा कलाध्यापक अध्यक्ष महिला आघाडी या पदावर नियुक्ती करण्यात आली.
छाया हारदे या राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला तालुकाध्यक्षा तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या सचिव पदावर आहेत. अपंगत्वावर मात करून त्यांनी अपंगांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
अहमदनगर जिल्हा कलाध्यापक अध्यक्ष महिला आघाडी या पदावर झालेल्या निवडी बाबत तालूक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटना तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवरांकडून त्यांचा सत्कार होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत